राज्यात विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्र धर्माचा जागर करण्यासाठी राज्यव्यापी वज्र निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य केलं आहे. गुजराती आणि मराठी वाद कधीच नव्हता. तो होऊ नये अशी आमची इच्छा आहे. पण दोन गुजराती ठग तिकडे बसले आहे. त्यांनी मुंबईतच नव्हे तर गुजरात आणि देश अशी भिंत तयार केली आहे, असा गंभीर आरोप करत उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.
ते म्हणाले की, शिवसेनेप्रमुखांचं एक भाषण दाखवा त्यात त्यांनी सर्व मुस्लिम शत्रू असल्याचं म्हटलं. या राष्ट्रात आणि महाराष्ट्रात राहणारे आमचे आहेत. हे आमचं हिंदुत्व आहे. आम्ही जातपात पाहत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, वाराणासीत ते का पाठी गेले, अयोध्येत का हरले. मला काही लोक भेटले. अयोध्येतील लोक हिंदुत्ववादी नाही का. जिथे राम मंदिर बांधलं, घाई घाईत बांधलं, गळकं बांधलं. एवढं होऊनही तुम्हाला राम का पावला नाही. तुमचा पराभव कुणी केला. हे सर्व केलं ते अदानी आणि लोढासाठी केलं का असं त्या लोकांचं म्हणणं आहे. कारसेवकांना अपंगत्व आलं. पुजारी आणि कंत्राटदारही गुजराती. का आणत आहे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
प्रत्येक राज्यामध्ये भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे. महाराष्ट्रामध्येही आपल्या भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे. आम्ही कोणाचे शत्रू नसून आम्ही फक्त न्याय हक्क मागत आहोत. आमचा लढा काय मुस्लिमांविरोधात आहे का? शिवसेनेप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे एक भाषण दाखवा, ज्यात त्यांनी सर्व मुस्लिम शत्रू असल्याचे म्हटले आहे. या राष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रात राहणारे आमचे आहेत. हे आमचे हिंदुत्व आहे. आम्ही जातपात पाहत नाही,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, ते पुढे म्हणाले की, “शिवसेना प्रमुख भाषणाची सुरुवात ‘मराठी भगिनी आणि बांधवांनो’ करायचे. त्यानंतर त्यांनी हिंदू बंधू भगिनी म्हटले. मीही निवडणुकीच्या काळात देशभक्त म्हटले. यात माझ काय चुकले? देशावर घाला घातला जात होता. त्यामुळे मी देशभक्त शब्द वापरला. महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी जो सोबत येईल, तो आमच्यासोबत.
दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर करावे, मी त्यांना पाठिंबा देईन. मला पुन्हा येईन, असे कधी वाटलेच नाही", असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.