ताज्या बातम्या

'सगळे ठग भाजपात त्यामुळे आम्ही ठगमुक्त' उद्धव ठाकरेंची दिल्लीतून भाजपावर हल्लाबोल

अरविंद केजरीवाल यांच्यावरील अटकेच्या कारवाईविरोधात इंडिया आघाडीने एकजूट दाखवत आज दिल्लीत ‘लोकतंत्र बचाओ महारॅली’चे आयोजन करण्यात आलं आहे.

Published by : shweta walge

मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीकडून अटकेची कारवाई करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांच्यावरील अटकेच्या कारवाईविरोधात इंडिया आघाडीने एकजूट दाखवत आज दिल्लीत ‘लोकतंत्र बचाओ महारॅली’चे आयोजन करण्यात आलं आहे. या महारॅलीत भाषण करताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"एक देश आणि एका व्यक्तीचे सरकार देशासाठी घातक होईल. हा देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे, हा केवळ संशय नसून वस्तुस्थिती आहे. दोन बहिणी हिंमतीने लढत असतील तर भाऊ कसे मागे राहतील. मला सुनीता केजरीवाल आणि कल्पना सोरेन यांना सांगायचे आहे की, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. मी भाजपला त्यांच्या बॅनरवर लिहिण्याचे आव्हान देतो - आमचे तीन सहयोगी ED-CBI-Income Tax आहेत. आता भारतात आघाडीचे सरकार आणण्याची वेळ आली आहे. आम्ही लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी येथे आहोत. " होय, यांनी अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांच्यावर आरोप केले आणि त्यांना तुरुंगात टाकले."

'एका पक्षाची सरकार देशासाठी घातक झाली आहे. तर आपल्याल देशात आघाडी आणावी लागेल. तुम्ही तुमचं भविष्य कोणाच्या हातात देणार? आम्ही इथे निवडणुकीच्या प्रचारासाठी नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी आलो आहोत.

'ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचा आरोप केला होता त्यांनाच आता वॉशिंगमशीनमध्ये टाकून ते स्वत:च्या पक्षात घेत आहेत. तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता का? देशात जेवढे भ्रष्ट लोकं आहेत त्यांना घेऊन भाजप देशाचा विकास करु शकतात का? भाजपमध्ये भ्रष्टाचारी लोकं आहेत' असा हल्लाबोल ठाकरेंनी केला आहे.

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी