Ramdas Kadam, Uddhav Thackeray Team Lokshahi
ताज्या बातम्या

'उद्धव ठाकरेंनी योगेश कदमला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न' रामदास कदम यांचा गंभीर आरोप

रामदास कदम यांचे पुत्र आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला शुक्रवारी भीषण अपघात झाला. या प्रकरणी योगेश कदम यांच्या कार्यकर्त्यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली होती.

Published by : shweta walge

रामदास कदम यांचे पुत्र आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला शुक्रवारी भीषण अपघात झाला. या प्रकरणी योगेश कदम यांच्या कार्यकर्त्यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. आता मंत्री रामदास कदम यांनी स्वत: यासंदर्भात थेट ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन गंभीर आरोप केला आहे. याबाबत सखोल तपासाची मागणी रामदास कदम यांनी केली आहे.

काय म्हणाले रामदास कदम,

हा अपघात नसून घातपात करण्याचा प्रयत्न आहे असा मला दाट संशय आहे. याबाबत मी पोलिसांशी बोललोय. यासंदर्भात कसून चौकशी करण्याबाबत त्यांना सांगितलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशीही मी याबाबत आज रात्री बोलणार आहे”, असं रामदास कदम वृत्तांशी बोलताना म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले की, योगेश कदम याला राजकारणातून पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी अनिल परबच्या खांद्यावर बंदूक ठेवून केला होता. मात्र, त्यात त्यांना यश आलं नाही. म्हणूनच आता त्याला जिवानिशी संपवण्याचा प्रयत्न केला की काय, असा मला संशय आहे. म्हणूनच याची चौकशी होणं आवश्यक आहे”, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

दरम्यान माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम यांच्या गाडीला मुबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूरजवळ गाडी मुंबईच्या दिशेने येताना डम्परने जोरदार धडक दिली आहे. या धडकेत गाडीच्या मागील बाजूचा पूर्ण चेंदामेंदा झाला. सुदैवाने यात योगेश कदम सुखरुप आहेत. मात्र त्यांच्या चालकाला आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीसाला दुखापत झाली आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result