आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर टीका केली आहे. निवडणूक २३ जानेवारीला होणं अपेक्षित होतं. ती निवडणूक आयोगाकडे आम्ही मागणी केली आहे. एकतर ही निवडणूक आम्हाला घेण्याची परवानगी द्या. नाहीतर जे आहे तसंच चालू ठेवा. आयोगाकडून अजून तसं काही उत्तर आलेलं नाही. आयोगाच्या परवानगीनंतर रीतसर निवडणूक होईल. या घटनेनुसारच शिवसेनेतील पदांचा उल्लेख केला आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना कुणाची? याबाबत निवडणूक आयोग निर्णय देणार आहे. मात्र त्याआधी सुप्रीम कोर्टाने आधी 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निकाली काढावा, त्यानंतर निवडणूक आयोगाने आपला निर्णय द्यावा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
तसेच ते म्हणाले की, शिवसेनेचे दोन गट मी मान्य करत नाही. शिवसेना एकच आहे आणि एकच राहणार आहे. शिवसेना आमचीच आहे. दुसऱ्या गटाला मी शिवसेना मानत नाही. असे त्यांनी म्हटले आहे.