ताज्या बातम्या

"शिंदेंनी बंडाचं निशाण फडकावतच ठाकरेंनी फडणवीसांना दिली होती 'ही' ऑफर"

Published by : Sudhir Kakde

एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावल्याची बातमी उद्धव ठाकरेंना समजताच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला होता अशी एक नवी माहिती आता समोर आली आहे. "उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्याशी वैयक्तिकरित्या संपर्क साधून भाजपनं थेट आपल्याशी डील करावा, जेणेकरून संपूर्ण पक्ष त्यांना पाठिंबा देऊ शकेल असं म्हटलं होतं" असं इंडिया टु़डेच्या वृत्तामधून समोर आलं आहे. मात्र भाजपने ही बाब नाकारली आहे. फडणवीस आणि ठाकरे यांच्यात समोरासमोर बोलणी झाल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही फोन केला. मात्र, त्यांनी उत्तर दिलं नाही. साहजिकच 2019 मध्ये भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वानं उद्धव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांनी कोणतीही चर्चा नाकारली होती याचे हे परिणाम असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याचा संशय आल्यानं शिवसेनेच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावलवण्यात आली. त्यानंतर हे सर्व सुरू झालं. मात्र, तोपर्यंत शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे 11 आमदारांसह बेपत्ता झाले होते. यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यांना विधानसभेत फ्लोअर टेस्ट करण्याची मागणी करणारं पत्र दिलं. भाजपच्या आवाहनानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारला 30 जून रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानंतर लगेचच फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. तसंच ते राज्य सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. त्यानंतर भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी फडणवीस यांना शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये सहभागी होण्याचे निर्देश दिले.

भाजपने ठरवलं की, त्यांना शिवसेनेचा पाठिंबा हवाय, मात्र त्याच वेळी त्यांना उद्धव ठाकरेंना शह देखील द्यायचा होता. शिंदे गटाच्या माध्यमातून ती संधी भाजपला मिळाली. काही खासदारांनी नुकतंच उद्धव ठाकरेंना पत्र लिहून राष्ट्रपती पदाच्या उमेदवार मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी विनंती केली होती. त्यानंतर शिवसेनेनं आता जाहीर केलंय़ की राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ते मुर्मू यांना पाठिंबा देतील. मात्र त्यानंतर सुद्धा मुर्मू यांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान भाजपनं मातोश्रीकडं कानाडोळा केला.

Sharad Pawar: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; शरद पवारांचं ट्विट करत सवाल...

Chitra Wagh: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

Amol Mitkari: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Varsha Gaikwad: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया

Nana Patole: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; नाना पटोले सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...