मुंबई : आज शिवनेरी किल्ल्याच्या प्रतिकृतीचं उद्घाटन झालं. मुंबई (Mumbai) विमानतळाजवळ असलेल्या या भव्यदिव्य प्रतिकृतीचं उद्घाटन आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM U , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह सेनेचे अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. पश्चिम दृतगती महामार्गाजवळ साकारण्यात आलेल्या या प्रकृतीचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतूक केलं.
"शिवरायांच्या प्रतिमेचं दर्शन मुंबईकरांना तर दिसणार आहेच, मात्र विमानतळावर येणाऱ्या प्रत्येकाला समजलं पाहिजे की आपण कोणत्या राज्यात आलो आहोत, या राज्याची अस्मिता काय आहे" असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच त्यांनी ही प्रकृती तयार करणाऱ्या सर्वांचं कौतूक मुख्यमंत्र्यांनी केलं. तसंच राज्यात सुरु असलेल्या सध्याच्या राजकारणावर बोलताना म्हणाले, 14 तारखेला मी सर्व गोष्टी बोलणार आहे.