ताज्या बातम्या

Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट, ठाकरे गटाच्या रमेश जाधवांचा उमेदवारी अर्ज दाखल

Published by : shweta walge

कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या उमेदवार म्हणून वैशाली दरेकर या रिंगणात आहेत. मात्र, या जागेवर केडीएमसीचे माजी महापौर तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण सह संपर्कप्रमुख, रमेश जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितल्या प्रमाणे आपण अर्ज दाखल केला असून सहा तारखेला स्क्रुटनीच्या दिवशी ठाकरे गट एबी फॉर्म देण्याची शक्यता असल्याचे रमेश जाधव यांनी सांगितले, यामुळे आता वैशाली दरेकर आणि रमेश जाधव या दोघांपैकी कोण आपला उमेदवारी अर्ज मागे घेतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दरम्यान वैशाली दरेकर यांच्या उमेदवारीमुळे उबाठा गटातील अनेक पदाधिकारी नाराज असून काहींनी शिंदे गटात प्रवेश देखील केला आहे. यामुळे दरेकर यांच्यावर असलेल्या नाराजीचा फटका पक्षाला बसू नये म्हणून ठाकरे गटाकडून ही सावध भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे,

ठाकरे गटात नाराजी नाट्य सुरू असताना माजी महापौर रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ठाकरे गटाने दरेकर यांना उमेदवार जाहीर केला असताना दुसरा उमेदवार अर्ज कसा भरू शकतो असे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवलेत जातायेत. 

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा