Uddhav Thackeray  Lokshahi
ताज्या बातम्या

स्वगृही परतताच वसंत मोरेंनी हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे म्हणाले; "शिवसेना सोडल्याबद्दल तुम्हाला शिक्षा तर..."

"लोकसभेच्या निवडणुकीआधी वसंतराव काय करतात? असा प्रश्न आम्हाला पडला होता. काय करायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न असतो. तुम्ही आधीपासूनच शिवसैनिक होता"

Published by : Naresh Shende

वसंत मोरे यांच्यासह इतर सहकारी आता स्वगृही परतले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीआधी वसंतराव काय करतात? असा प्रश्न आम्हाला पडला होता. काय करायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न असतो. तुम्ही आधीपासूनच शिवसैनिक होता. मध्यल्या काळात तुमची दिशा चुकली, असं मी म्हणणार नाही. पण शिवसेनेच्या बाहेर पक्षात काय वागणूक मिळते, काय सन्मान मिळतो, याचा अनुभव घेतला. तो अनुभव घेऊन तुम्ही आता परिपक्व होऊन स्वगृही परतला आहात. त्यामुळे आज तुमच्या कामाची जबाबदारी मोठी आहे. तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना शिवबंधन बांधत असताना, काही जण मला म्हणाले, पहिले आम्ही सुद्धा शिवसैनिक होतो. मग आता शिवसेना सोडल्याबद्दल तुम्हाला शिक्षा तर झाली पाहिजे. ती वसंतराव यांनाही झाली पाहिजे. पुण्यात कित्येक पटीने मला शिवसेना वाढवून पाहिजे, हीच शिक्षा आहे, असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांच्या पक्षप्रवेशादरम्यान केलं. मोरे यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीत देशाला एक दिशा दाखवली आहे. आपली लोकशाही, संविधान धोक्यात आणलं होतं. त्या संविधानाचा रक्षक म्हणून शिवरायांचा महाराष्ट्र पुढे सरसावला. महाराष्ट्र देशाला दिशा दाखवत आला आहे. आताही महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली आहे. ती लढाई देशाच्या आणि संविधानाच्या रक्षणाची होती. आताची लढाई गद्दारी, खोकेबाजी आणि लाचारीच्या विरोधात होणार आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी ही लढाई होणार आहे. पुणे कांतिकारक, विचारवंत, विद्येचं माहेरघर आहे. पुणे उद्याच्या सत्ताबदलाचं केंद्र असलं पाहिजे. सत्ताबदलाची सुरुवात पुण्यातून झाली पाहिजे.

पुण्यात लोकसभेच्या निमित्ताने मी आलो होतो. आता मी माझ्या शिवसैनिकांच्या मेळाव्याला येईल. त्यावेळी शहरातील सर्व कार्यकर्ते आणि शिवसैनिकांना एकत्र बोलवा. तुमच्या माध्यमातून शिवसेना आणखी कित्येक पावलं पुढं जाईल. एकेकाळी पुण्यात शिवसेनेचे पाच आमदार होते. तो काळ मला पुन्हा आणायचा आहे. शिवसेना पुन्हा भगवामय करायची आहे आणि तो भगवा तुम्ही फडकवाल, यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट