ताज्या बातम्या

ठाकरे आणि शिंदे गटातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

राज्यातील सत्तासंघर्षावर आज होणारी सुनावणी आता आणखी लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी २२ ऑगस्ट रोजी होईल असं सांगितल होतं. मात्र, आज होणारी सुनावणी ही उद्या २३ ऑगस्टला होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यातील सत्तासंघर्षावर आज होणारी सुनावणी आता आणखी लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी २२ ऑगस्ट रोजी होईल असं सांगितल होतं. मात्र, आज होणारी सुनावणी ही उद्या २३ ऑगस्टला होणार आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती आज उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर गेली असे सांगण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयातील त्रिसदस्यीय खंडपीठापैकी न्यायमूर्ती सी. टी. रवीकुमार उद्या अनुपस्थित असल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आजची सुनावणी आता उद्या होणार आहे. ७ ऑगस्ट रोजी शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या पाच याचिकांवर सरन्यायाधीश व्ही. एन. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़. या प्रकरणावर सखोल कायदेशीर युक्तिवाद होण्याची गरज असेल तर हे प्रकरण व्यापक घटनापीठाकडे देण्याचा विचार केला जाऊ शकतो,

सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी ४ ऑगस्टला शेवटची सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेना कुणाची या मुद्द्यावर आता निवडणूक आयोगातही कार्यवाही सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. पण आयोगानं दोन आठवड्यांचाच वेळ दिला आहे. २३ ऑगस्टला याची मुदत संपत असून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी देखील २३ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी