ताज्या बातम्या

Uddhav Thackeray ; बुलढाण्यात उद्धव ठाकरे महायुतीवर कडाडले, म्हणाले...

उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील सभेत महायुतीवर जोरदार टीका केली. शिवरायांचा भगवा झेंडा मावळ्यांच्या हातात शोभतो, दरोडेखोरांच्या हातात नाही, असे त्यांनी म्हटले. जयश्री शेळकेंच्या प्रचारासाठी झालेल्या या सभेत त्यांनी भाजपवरही निशाणा साधला.

Published by : shweta walge

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची ठिकठिकाणी सभा होत आहे. तर आज जयश्री शेळकेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची बुलढाण्यात सभा पार पडली. या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे निर्माण केले होते. शिवरायांचा जो भगवा झेंडा आहे, तो मावळ्यांच्या हातात शोभून दिसतो, दरोडेखोरांच्या हातात नाही. चाळीस जणांची टोळी आली अन् आपल्या पक्षावर दरोडा घालून पक्ष चोरुन नेला. आता म्हणतात हा पक्ष आमचा आहे. ते गद्दार, खोकेबाज आणि धोकेबाज आहेत, अशी घणाघाती टीका महायुती आणि भारतीय जनता पक्षावर केली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

तुम्ही सर्वांनी आपल्या जयश्रीताईंना आमदार करा, आपलं बहुमत आल्यावर जालिंदरला आमदार करण्याचं काम माझं असेल, जालिंदरसारखी माणसं हल्ली सापडत नाही. त्यांनी संपूर्ण तयारी केली होती. पण माझा आदेश ऐकला आणि तो थांबला. पण आता मी त्याची जबाबदारी घेतली आहे. मी फसवाफसवी करणार नाही. थोतांड बोलणार नाही. शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं होतं. इतर गोष्टी जातील आणि परत येतील. पण डोनाल्ड ट्रम्पही हरले होते पण परत निवडूनही आले. त्यामुळे आपण शब्द दिला की वाट्टेल ते झालं तरी शब्द खाली पडून द्यायचा नाही. यावेळची निवडणूक ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. आपल्या विरोधात सगळे महाराष्ट्र द्रोही आहेत.

भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचींही मला कमाल वाटते, की तुम्ही चोर आणि दरोडेखोरांना घेऊन आमच्यावर कसे काय चालून येता. ज्यावेळी भाजपला महाराष्ट्रात कुणी ओळखतही नव्हतं त्यावेळी आम्ही तुम्हाला साथ दिली. शिवसेना नसती तर नरेंद्र मोदी हेदेखील पंतप्रधान झाले नसते. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते. पण तुम्ही हिंदुत्त्वाचा भ्रम निर्णण केला. वर गेल्यावर आम्हालाच लाथा घालू लागले, पण ठीक आहे, आता आम्हीही तुमचं तंगडं धरून तुम्हालाच महाराष्ट्राच्या बाहेर भिरकावून दिलं नाही तर मी छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलणार नाही. असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Aditya Thackeray Dhruv Rathee: आदित्य ठाकरेंनी युट्युबर ध्रुव राठीचं आव्हान स्वीकारलं; नेमकं प्रकरण काय ?

Ajit Pawar Interview | कटेंगे तो बटेंगे ते महाराष्ट्राची महानिवडणूक, अजित पवारांची रोखठोक मुलाखत

दिल्ली-एनसीआरची हवा 'विषारी'

BJP Batenge To Katenge: 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा, वाढला राजकीय पारा

भरपावसात फडणवीसांची सभा, पावसात भिजलो की सीट निवडून येते: फडणवीस