Uddhav Thackeray  Lokshahi
ताज्या बातम्या

संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचं विरोधकांवर शरसंधान, म्हणाले; "महाराष्ट्रात मोदी सरकारचं उधळलेलं खेचर..."

"तुम्ही काल जिंकले असाल, पण मी संभाजीनगर जिंकल्याशिवाय हटणार नाही. मी संभाजीनगर जिंकणार म्हणजे जिंकणारच"

Published by : Naresh Shende

संभाजीनगरमध्ये जाणीवपूर्वक आलो आहे. कारण जे गद्दार इकडे दुर्देवाने जिंकले आहेत, त्यांना सांगायला आलो आहे की, तुम्ही काल जिंकले असाल, पण मी संभाजीनगर जिंकल्याशिवाय हटणार नाही. मी संभाजीनगर जिंकणार म्हणजे जिंकणारच. आपण एक विचार केला पाहिजे की, महाराष्ट्रात मोदी सरकारचं उधळलेलं खेचर ४०० पार करणार होते, आपण त्यांना ४० वरून ९ वर आणलं आहे. पण या विजयात माझ्या हक्काचा संभाजीनगरचा खासदार नाही. हे शल्य माझ्याप्रमाणे तुम्हाला आणि शिवसेनाप्रमुखांनाही झालं असणार. हेच ते संभाजीनगर ज्याला मराठवाड्याची राजधानी म्हणतात. याच संभाजीनगरमध्ये शिवसेनाप्रमुखांनी हिंदूत्वाची भगव्याची बीजं रोवली. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे मराठवाडा पादाक्रांत केला. मराठवाड्याचे इतर सर्व भगव्याचे पाईक असलेले खासदार निवडून आले. पण हक्काची संभाजीनगरची जागा गमवावी लागली, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागली. ते संभाजीनगरमध्ये शिवसंकल्प मेळाव्यात बोलत होते.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, कारणमीमांसा काहीही असेल, पण हार झालेली आहे. आपण अतिआत्मविश्वासाने लढलो का? कारण आपला उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी विजय असो किंवा परभाव शिवसेना पक्ष सोडला नाही. अमीषं त्यांनाही दाखवली गेली असतील. पण तरीसुद्धा निष्ठेने राहिले. त्या निष्ठेचा आदर मी त्यांना यावेळी उमेदवारी देऊन केला होता. शेवटी निष्टाच महत्त्वाची असते. हार, जीत होत असते. निवडणूका येतात, निवडणूका जातात.

पुन्हा निवडणूका येतात. निवडणुकांमध्ये हरलो म्हणजे आयुष्य संपत नाही. पण लढण्याची हिंम्मत हारलो, तर मात्र आयुष्य संपतं. मी निवडणूक हरलो, तरी पुन्हा जिंकेल, म्हणून मी संभाजीनगरमध्ये आलो आहे. आता तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. कालची लढाई आपल्या देशाची, संविधानाची आणि लोकशाहीची लढाई होती. आता विधानसभेची लढाई महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई आहे.

या महाराष्ट्राची ओळख इतिहासात लिहिली पाहिजे, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. महाराष्ट्र हा साधू-संतांचा, वीरांचा, मर्दांचा आहे. ही आपली ओळख अशीच ठेवणार. लाचार, गद्दारांचा महाराष्ट्र अशी ओळख महाराष्ट्राची करायची का? हे आपण ठरवायचं आहे. पण मी लाचारी आणि गद्दारीचा महाराष्ट्र होऊ देणार नाही. प्राण पणाने लढेल पण माझ्या शिवरायाच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही, ही शपथ घेऊन मी मैदानात उतरलो आहे.

ज्यावेळी या विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली, पहिल्याच दिवशी मी म्हटलं होतं की, हे गळती सरकार आहे. या गळती सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन आहे. हे शेवटचं अधिवेशन आहे. यानंतर निवडणुका आल्यावर हे जुमलेबाज सरकार या गादीवर दिसणार नाही, ही शपथ घेऊन या मैदानात उतरलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश