Udayan Raje Bhosale Team Lokshahi
ताज्या बातम्या

"ED माझ्या ताब्यात द्या, मग सगळ्यांना..."; खासदार उदयनराजे भडकले

मला कार्टून नेटवर्कवरील टॉम अँड जेरी आवडतं पण सध्या मी ते बघायचे बंद केलंय असंही उदयनराजे म्हणाले आहेत.

Published by : Sudhir Kakde

सातारा : सध्या राज्यात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्‍या राजकीय घडामोडींवर खासदार उदयनराजे भोसले (Udayan Rane Bhosale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्‍हणाले “सध्याचे राजकीय वातावरण कुणी बिघडवले याचा विचार केला पाहिजे. मला कार्टून नेटवर्कवरील टॉम अँड जेरी आवडतं पण सध्या मी ते बघायचे बंद केले आहे. राज्‍यातील काही नेत्‍यांच्‍या ज्‍या माकड उड्या चालल्या आहेत त्या बघत बसतो. कोण कुणाला मारतंय, कोण कुणाला आत टाकतंय हे बघतो. खूप मजा येते.” असं मिश्कील वक्तव्य उदयनराजेंनी केलं आहे.

उदयन राजे पुढे म्हणाले की, या लोकांनी पैसे खाल्लेच आहेत, माझ्या हातात ईडी द्या मग दाखवतो यांना. ही‘ईडी’ची चेष्टा झाली आहे. पानपट्टीवर बिडी मिळते तशी अवस्था‘ईडी’ची झाली आहे. ईडी लावा अन् सगळ्यांना ताब्यात घ्या. दांडक्याने यांना सडकून काढले पाहिजे असंही उदयनराजे म्‍हणाले आहेत.

एका बाजूला फुटपाथवर लोक झोपत आहेत या लोकांना दिसत नाही का? प्रत्येकाने एकमेकांची पाठ थोपटायची जेलमध्ये आहे तरी त्याने काही केले नाही. दीड वर्ष, दोन वर्ष जेलमध्ये पण त्याने काही केले नाही म्हणायचे असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीतील तुरुंगात गेलेल्या नेत्यांना टोला लगावला.

तसंच लोकांना डोळे नाही? लोकांना मेंदू नाही? असे सवाल करत लोक हसतायत, असं ते म्हणाले. जर निवडणुका लागल्या तर हे कसे उभारणार हे त्यांचे त्यांनाच माहिती. माझ नाव घ्यायचं नाही मी कुणाच्या नादाला लागत नाही, असा गर्भित इशारा यावेळी उदयनराजेंनी दिलाय.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result