ताज्या बातम्या

म्हाडाची बनावट वेबसाईट बनवल्याप्रकरणी आणखी दोघांना अटक

म्हाडाची बनावट वेबसाईट बनवल्याप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

म्हाडाची बनावट वेबसाईट बनवल्याप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. वेब डेव्हलपर आणि ग्राफिक डिझायनरला अटक केली आहे. याच्याआधी बनावट संकेतस्थळ बनवणारा आणि म्हाडाचा अधिकारी असल्याचा बनाव करणाऱ्या अश्या दोघांना अटक करण्यात आली होती.

त्यानंतर आता वेब डेव्हलपर आणि ग्राफिक डिझायनरला अटक केली आहे. या बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून यांनी अनेकांना लाखोंचा गंडा घातला होता. बनावट वेबसाईटवर अर्ज प्रक्रिया न राबवताच थेट पेमेंटचा पर्याय असून इच्छुकांकडून प्रत्येकी ५०,००० ऑनलाईन भरून बनावट पावत्या दिल्याचं तपासात उघड झालं आहे.

त्यामुळे आता अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाचा वापर करण्याचं पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं आहे.

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु