टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क हे ट्विटरचे मालक बनले आहेत. एलॉन मस्क यांनी कंपनीच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत. ट्विटरच्या वापरकर्त्यांना अकाऊंट वेरिफाईड करुन ‘ब्लू टिक’ मिळवण्यासाठी आठ डॉलर म्हणजेच अंदाजे ६६१ रुपये प्रती महिना मोजावे लागणार आहेत. याची माहिती त्यांनी स्वत: सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे.
‘कंटेंट मॉडरेशन’ धोरणाचे पुनरावलोकन करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय मस्क यांनी घेतला असून त्यांनी सांगितले की, ट्विटरच्या या ‘ब्लू टिक’ सेवेचे अनेक फायदे असतील, ”रिप्लाय’, ‘मेन्शन’ आणि ‘सर्च’ या सेवांमध्ये नव्या धोरणानुसार वापरकर्त्यांना प्राधान्य मिळणार आहे. यामुळे स्पॅम आणि स्कॅमपासून वाचण्यास मदत होईल. याशिवाय वापरकर्त्यांना मोठे व्हिडीओ आणि ऑडिओदेखील पोस्ट करता येणार आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त जाहिरातींपासूनही वापरकर्त्यांची सुटका होईल” असे एलॉन मस्क यांनी सांगितले आहे.