ताज्या बातम्या

Nashik : नाशिकमध्ये आज आदिवासी समाजाचा मोर्चा

Published by : Siddhi Naringrekar

महेश महाले, नाशिक

आदिवासी समाजाचा आज नाशिकमध्ये एल्गार आहे. पेसा कायद्याअंतर्गत 17 संवर्गातील भरतीसाठी आदिवासी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तपोवन परिसरातून आदिवासी आयुक्तालयावर धडकणार विराट मोर्चा निघणार आहे.

पक्षभेद विसरून आदिवासी लोकप्रतिनिधींनी मोर्चा सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गेल्या 27 दिवसांपासून नाशिकमध्ये उपोषण सुरु आहे. आदिवासी आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर गेल्या 6 दिवसांपासून हे बेमुदत उपोषण पुकारण्यात आले आहे.

माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली हा एल्गार मोर्चा काढण्यात येणार असून सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा जे पी गावित यांनी इशारा दिला आहे. जवळपास 70ते 80 हजार आदिवासी बांधव आंदोलनात सहभागी होण्याचा अंदाज आहे.

Mahayuti Report Card | महायुतीने रिपोर्ट कार्डमधून मांडला अडीच वर्षांच्या कामाचा लेखाजोखा

Lawrence Bishnoi Munawar Faruqui: स्टॅंडप कॉमेडियन मुनव्वर फारुकी लॉरेन्स बिश्नोईच्या रडारवर? काय आहे कारण...

'महायुतीच्या रिपोर्टकार्डला, महाराष्ट्र डिपोर्टकार्ड नाव देईल'आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Latur Crime| पॅरोलवर सुट्टी घेवून आलेल्या आरोपीनं पत्नीची गोळ्या झाडून केली हत्या

महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमधून देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर जोरदार टीका; म्हणाले...