थो़डक्यात
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली
रश्मी शुक्लानंतरच्या सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पदभार देण्याची सूचना
रश्मी शुक्लानंतरच्या तीन अधिकाऱ्यांची नावं पाठवण्याचे आयोगाने आदेश
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती
मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली झाल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती. रश्मी शुक्लानंतरच्या सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पदभार देण्याची सूचना देण्यात आली आहे. तर रश्मी शुक्लानंतरच्या तीन अधिकाऱ्यांची नावं पाठवण्याचे आयोगाने आदेश दिले आहे.
नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात आरोप केला आहे की, रश्मी शुक्ला या एक वादग्रस्त अधिकारी आहेत ज्यांनी भारतीय जनता पक्षाची (भाजप) बाजू घेतली आहे आणि त्यांच्या पदावर कायम राहिल्याने निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यावर शंका निर्माण होईल.