गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या तीव्र टंचाईने सामान्यांच्या खिशाला झळ बसली आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 80 ते 120 रुपये किलो, तर घाऊक बाजारात 65 ते 70 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. देशाच्या बहुतांश भागात उच्च तापमान, कमी उत्पादन आणि उशीर झालेला पाऊस यामुळे किंमती वाढल्या आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षी टोमॅटोची पेरणी कमी झाली होती कारण बहुतेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी सुरू केली होती, ज्याची किंमत गेल्या वर्षी जास्त होती.
बाजारात टोमॅटोचे दोन प्रकार आहेत. 80 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत विकली जात आहे. देशात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकावर परिणाम झाला आहे, त्यामुळे टोमॅटो बाजारात कमी येत आहेत आणि जेव्हा जेव्हा बाजारात कोणत्याही भाजीपाल्याची कमतरता असते तेव्हा त्याची किंमत वाढते.