ताज्या बातम्या

दिवा लोकलसाठी प्रवासी संघटनांचं आज आंदोलन; कोकणातील रेल्वे गाड्यांनाही दिव्यात थांबा देण्याची मागणी

कोकण रेल्वेकडे जाणाऱ्या गाड्यांना दिवा येथे थांबा देण्यासाठी दिवा प्रवासी संघटनेद्वारे आज 14 ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Published by : Dhanshree Shintre

मध्य रेल्वेवरील दिवा स्थानकात वाढणारी गर्दी बघता, दिवा रेल्वे स्थानकावरून थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) साठी लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच कोकण रेल्वेकडे जाणाऱ्या गाड्यांना दिवा येथे थांबा देण्यासाठी दिवा प्रवासी संघटनेद्वारे आज 14 ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेवरील ठाणे आणि डोंबिवलीदरम्यान असलेले दिवा हे प्रचंड गर्दीचे स्थानक आहे. गेल्या काही वर्षात दिवा येथे लोकवस्ती वाढल्याने, लोकल प्रवाशांची गर्दीही वाढली. त्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी आणि गर्दीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे दिवा स्थानकातून लोकलच्या दरवाज्याला लटकून प्रवास करावा लागतो.

परिणामी, प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतो किंवा प्रवासी जखमी होतात. तसेच दिवा स्थानकात सुमारे 1.26 लाख तिकीट विक्रीतून दैनंदिन महसूल सुमारे 6.62 लाख रुपये आहे. मात्र, एवढी कमाई होत असून देखील दिवा-सीएसएमटी लोकल सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज सकाळी 9:00 वाजता प्रवाशी काळ्या फिती लावून आंदोलन करतील.

Ajit Pawar Interview | कटेंगे तो बटेंगे ते महाराष्ट्राची महानिवडणूक, अजित पवारांची रोखठोक मुलाखत

दिल्ली-एनसीआरची हवा 'विषारी'

BJP Batenge To Katenge: 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा, वाढला राजकीय पारा

भरपावसात फडणवीसांची सभा, पावसात भिजलो की सीट निवडून येते: फडणवीस

Ravindra Dhangekar Kasaba Peth Assembly constituency: रवींद्र धंगेकर कसबा पेठ मतदारसंघासाठी सज्ज