ताज्या बातम्या

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस

Published by : Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केलं आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, आंदोलन काळातील आंदोलकावरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच उपोषण सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला प्रतिउत्तर म्हणून मंगेश ससाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उपोषण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. जालन्यात ओबीसी - मराठा संघर्षाची शक्यता आहे.

यासोबतच आता मनोज जरांगे पाटील यांच्यापाठोपाठ लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषण करतात का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

वडीगोद्रीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने