मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केलं आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, आंदोलन काळातील आंदोलकावरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे.
जरांगेची प्रकृती खालावली असून रात्री डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना उपचार घेण्यास विनंती करण्यात आली मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यापासून नकार दिला होता.
जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत उपचार घेणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत असल्याने मध्यरात्रीपासून उपोषणस्थळी त्यांना सलाईन लावण्यात आलं. ग्रामस्थांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेतले.