ADV Gunratna Sadawarte Team Lokshahi
ताज्या बातम्या

सदावर्तेंची साताऱ्यातील कोठडी आज संपणार, पुढे काय?

मुंबई, सातारा नंतर सदावर्ते यांच्यावर अकोला,बीड,कोल्हापूर, पुणे या ठिकाणी देखील गुन्हे दाखल झाले आहेत

Published by : Vikrant Shinde

वकील गुणरत्न सदावर्ते (adv. Gunratna Sadavarte) हे शरद पवारांच्या (Sharad Pawar) मुंबई येथील 'सिल्व्हर ओक' (Silver Oak ह्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असतानाच सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. ती कोठडी आज संपणार आहे.

आता पुढे काय?

काल (17-04-2022) पोलिसांकडून सदावर्तेंची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या आवाजाचे नमुने घेऊन ते पुणे येथील फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत. तर आज त्यांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. ह्यावेळी पोलीसांकडून न्यायालयाकडे आणखी दोन दिवस कोठडी मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, आज न्यायालयाकडून काय निर्णय येतोय ह्याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा