ताज्या बातम्या

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केलं आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, आंदोलन काळातील आंदोलकावरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला प्रतिउत्तर म्हणून मंगेश ससाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उपोषण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

यासोबतच आता मनोज जरांगे पाटील यांच्यापाठोपाठ लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेसुद्धा उपोषणाला बसले आहेत. आज लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

आरोग्य पथकांकडून लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची आरोग्य तपासणी करण्यात आली मात्र हाके आणि वाघमारे यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याची माहिती मिळत आहे.

Latest Marathi News Updates live: जम्मू-काश्मीरच्या चकमकीत सुरक्षा दलाचे जवान जखमी

Kalyan Shirkant Shinde: "सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणाऱ्यांना कळणार नाही गरीबी काय असते", श्रीकांत शिंदेंची मविआवर टीका

Sunil Tingre Notice | सुनील टिंगरे यांची शरद पवारांसह ठाकरे गट, काँग्रेसला नोटीस, प्रकरण काय?

Maha Vikas Aghadi Manifesto: महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा; जाहीरनाम्यात काय?

Latest Marathi News Updates live: महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध; जाहीरनाम्यात काय?