ताज्या बातम्या

Winter Session 2022 : हिवाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस ; विरोधकांकडून कामकाजावर बहिष्कार?

राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच राजकारण तापल्याचं दिसून येतंय. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटलांचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबन...

Published by : Pankaj Prabhakar Rane

नागपूर : राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच राजकारण तापल्याचं दिसून येतंय. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटलांचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आल्यानं विरोधकांकडून त्याचे पडसाद उमटत आहेत. राज्यभरात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निषेध आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, आजचा राज्य विधीमंडळाच्या हिवाळ अधिवेशनाचा पाचवा दिवस असून आज विरोधकांकडून पुन्हा एकदा वादळ उठणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच विधीमंडळाच्या कामकाजावर विरोधकांकडून बहिष्कार घातला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर दिवसभर विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून निषेध आंदोलन करण्याचीही शक्यता आहे. फोन टॅपिंगच्या प्रकरणात राज्य सरकारने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या चौकशी प्रकरणी क्लोजर रिपोर्ट हायकोर्टात दाखल केल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला होता. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी नियमांचा हवाला देत चर्चा नाकारली. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.

तसेच विरोधकांकडून एनआयटी भूखंड प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. तर, दुसरीकडे सत्ताधारी आमदारांनी दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी चौकशीची मागणी लावून धरली होती. दोन्ही बाजूंकडून गदारोळ सुरू असल्याने विधानसभेचे कामकाज काही वेळेस स्थगित करण्यात आले होते. दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

त्यानंतर विरोधकांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना बोलू देण्याची मागणी केली होती. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी ही परवानगी नाकारल्याने विरोधक आक्रमक झाले. या गदारोळात राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांसाठी असंसदीय शब्द उचारला. त्यानंतर त्यांच्यावर अधिवेशन संपेपर्यंत सभागृहातून निलंबित करण्याचा ठराव मंजूर झाला. जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला असल्याचे दिसून आले. पायऱ्यांवर सुरू असलेल्या विरोधकांच्या आंदोलनात जयंत पाटीलही सहभागी होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. 'आठ दिवस असेच जातील जयंत पाटील पुन्हा येतील...' 'हम मे है दम,करेक्ट कार्यक्रम करेंगे हम' अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्या.

दरम्यान, आज महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, आणि जयंत पाटील यांचे निलंबन या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होणार असल्याची शक्यता आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट