अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Hiraben Modi) यांचा आज शंभरावा वाढदिवस आहे. यानिमित्त पंतप्रधान मोदी गांधीनगर येथील हिराबेन मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचले असून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. तसेच, मिठाई देउन वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. मोदींना आईला शाल गिफ्ट दिली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त मोदींनी त्यांची भेट घेतली असून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आईच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात आईच्या दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी पुजा करणार आहेत. तर, हिराबेन यांच्या शताब्दी वर्षानिमित्त गांधीनगर येथील एका रस्त्याला हिराबेन यांचं नाव दिलं जाणार आहे, अशी माहिती गांधीनगरच्या महापौरांनी दिली आहे.
पंतप्रधान मोदी सध्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. यापूर्वी 11 मार्च रोजी पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असताना अहमदाबादमध्ये त्यांनी आईची भेट घेतली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. आज सकाळी 9.15 वाजता, पंतप्रधान पावागड टेकडीवरील श्री कालिका मातेच्या पुनर्विकसित मंदिराला भेट देतील आणि उद्घाटन करतील, त्यानंतर ते सकाळी 11:30 वाजता हेरिटेज फॉरेस्टला भेट देतील. यानंतर, दुपारी 12:30 वाजता, पंतप्रधान वडोदरा येथे गुजरात गौरव अभियानात सहभागी होतील जिथे ते 21,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.