पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची दाणादाण उडालेली पाहायला मिळाली. मुंबईतील मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी, रेल्वेसेवेला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. आज सुद्धा मुंबई, ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मुंबई विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती मिळत आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एफवाय बीएस्सी आयटी आणि एमएमएसच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
बीए, बीकॉम, बीएससी पहिल्या सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आजच्या परीक्षा 18 आणि 20 जुलैला होणार असून एमएमएसच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा 20 जुलैला होणार असल्याची माहिती मिळत आहे. परीक्षांच्या वेळेत मात्र कुठलाच बदल करण्यात आलेला नाही आहे.