ताज्या बातम्या

'तो' वाघ अखेर जेरबंद ; चार जणांचा घेतला होता बळी

28 जून, 16 ऑगस्ट, 17 ऑगस्ट व 4 नोव्हेंबर रोजी SAM - II या नर वाघाने चार जणांचा बळी घेतला.

Published by : Sagar Pradhan

अनिल ठाकरे|चंद्रपूर : चार जणांचा बळी घेणाऱ्या SAM - II या नर वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. वाघ जेर बंद झाल्याची माहिती करतात नागरिकांनी आनंद व्यक्त केला . चंद्रपूर जिल्ह्यात वाघ माणूस संघर्षाने टोक गाठलं आहे. दोन दिवसात वाघाच्या हल्ल्यात बळी जात आहेत.

चंद्रपूर जिल्ह्याची ओळख वाघांच्या जिल्हा अशी आहे. जगप्रसिद्ध ताडोबात वाघांना बघण्यासाठी परदेशातील पर्यटक सुद्धा इथं येतात. मात्र आता वाघांनी जंगलाची सीमा ओलांडली आणि थेट गाववेशीवर येऊन धडकले आहेत. यातून वाघ माणूस संघर्षाने टोकं गाठले.वाघांचे सर्वाधिक हल्ले ब्रम्हपुरी परिसरातील वनपरिक्षेत्रात झालेत.

28 जून, 16 ऑगस्ट, 17 ऑगस्ट व 4 नोव्हेंबर रोजी SAM - II या नर वाघाने चार जणांचा बळी घेतला. सातत्याने वाघाच्या हल्ल्यात मनुष्य हानीच्या घटना घडलेल्या होत्या. त्यानंतर या वाघावर सातत्याने लक्ष ठेवण्यात आहे. कॅमेरा ट्रॅप मध्ये टिपण्यांत आलेल्या छायाचित्रांनुसार सदर च्या घटना SAM -II या नर वाघाने केल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हा पासून या वाघाचे सनियंत्रण करून त्याच्या हालचालीवर वन विभाग लक्ष ठेऊन होते. सदर वाघाचा ब्रम्हपुरी उपक्षेत्रातील शेतशिवारात नियमीत वावर असल्याने व मानवी जीविता कायम असल्याने त्यास जेरबंद करण्याची कार्यवाही सुरु होती. मंगळवार 8 नोव्हेंबर रोजी SAM - II वाघास ब्रम्हपुरी उपक्षेत्रातील कक्ष क्रमांक 118 मध्ये सायंकाळी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी डार्ट करुन बेशुद्ध केले व पिंजऱ्यात जेरबंद केले. यावेळी वन विभागाची संपूर्ण टीम होती.

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका