काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणुकी दिवसांदिवस चर्चेत येत आहे. काँग्रेस पक्षाकडून सध्या या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. अशातच अध्यक्ष पदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत खर्गे यांच्यासह दीपेंद्र हुडा, गौरव बल्लभ आणि नासिर हुसेन उपस्थित होते. यादरम्यान काँग्रेसच्या तीन बड्या प्रवक्त्यांनी राजीनामे दिल्याचे कळते.
राजीनामा देणाऱ्या प्रवक्त्यांमध्ये गौरव बल्लभ, दीपेंद्र हुडा आणि नासिर हुसेन यांचा समावेश आहे. यावर पक्षाचे प्रवक्ते गौरव बल्लभ म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार आम्ही पक्षाच्या प्रवक्त्या पदाचा राजीनामा दिला असून खर्गे यांच्या प्रचारासाठी पुढे काम करणार आहोत.
या पत्रकार परिषेदेत बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, गांधी परिवाराने या देशासाठी बलिदान दिले आहे. दहा वर्षे काँग्रेस सरकारमध्ये असलेल्या सोनिया गांधींनी पंतप्रधान होण्याचा प्रयत्न केला नाही, की त्यांनी राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचा प्रयत्न केला नाही. आजही राहुल गांधी उन्हात ‘भारत जोडो यात्रा’ करत आहेत. अशी प्रतिक्रिया यावेळी खर्गे यांनी दिली.