थोडक्यात
अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी
मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीवजा मेसेज आला
मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. धमकी देणाऱ्याने लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकीवजा मेसेज मु़ंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला आला आहे.
वाहतूक नियंत्रण कक्षाला आलेल्या मेसेजमध्ये लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ बोलत असून सलमान खानला जिवंत रहायचं असेल तर त्याने आमच्या मंदीरात जाऊन माफी मागावी, नाहीतर ५ कोटी रुपये द्यावे. न दिल्यास जीवे मारू. आमची गँग आजही अॅक्टीव्ह आहे.
असा धमकीवजा मेसेज वाहतूक नियंत्रण कक्षाला काल मध्यरात्री आला आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.