अमरावतीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी खासदार नवनीत राणा यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रात नवनीत राणा यांच्या विरोधात अतिशय खालच्या पातळीच्या आणि अश्लील भाषेचा उल्लेख आहे. या प्रकरणानंतर त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.