संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होऊन ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे. 14 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल, असेही सांगण्यात आले. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होईल आणि 6 एप्रिलपर्यंत चालेल, ज्यामध्ये सामान्य सुट्टीसह 66 दिवसांत 27 बैठका होणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काही विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. राज्यातील प्रलंबित मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच होणार असे त्यांनी सांगितले.
तसेच यंदाच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला चांगले सहकार्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.