राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर त्यांनी स्पष्ट देखिल केलं की, मी राष्ट्रवादीसोबतच राहणार आहे. मात्र, एका मुलाखतीत दादांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली आणि पुन्हा या चर्चा रंगू लागल्या.
याच पार्श्वभूमीवर आता राज्यभरात अजित पवारांचे पोस्टर्स लावून दादांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांचे पोस्टर्स लावले आहेत. मुंबईत हे पोस्टर लावण्यात आले आहे.
त्यानंतर आता मोदी मंत्रिमंडळातील या मंत्र्याने केली आता महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. आजकाल प्रत्येकजण मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत आहे. मलाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. मी मुख्यमंत्री व्हायला तयार आहे. असे आठवले म्हणाले.
तसेच ते म्हणाले की, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यात चढा-ओढ सुरू आहे, पण जो पर्यंत एकनाथ शिंदे आहेत, तो पर्यंत दुसऱ्या कोणाचा नंबर लागणार नाही. सध्या आमचे सरकार स्थिर असून एकनाथ शिंदे चांगले काम करत आहेत. मी नक्कीच मुख्यमंत्री व्हायला तयार आहे. असे आठवले म्हणाले.