ताज्या बातम्या

1 September पासून 'हे' नियम बदलणार, तुमच्यावर कसा होणार परिणाम?

Published by : Siddhi Naringrekar

ऑगस्ट महिना संपत आला आहे. 1 तारखेपासून नवे नियम येणार आहेत. या नवीन नियमांमध्ये काही नियमांचा तुम्हाला सामना करावा लागणार आहे. तुमच्या खिशाला आराम तर काही तुमचं बजेट वाढवणारे ठरू शकतात. जाणून घेऊयात 1 तारखेपासून कोणते नवे बदल होणार आहेत.

1 सप्टेंबरपासून विमा पॉलिसीचा प्रीमियम कमी होणार आहे. जनरल इंश्युरन्स नियमांमध्ये नुकतेच काही बदल करण्यात आले आहेत. या नव्या नियमान्वये ग्राहकांना आता 30% ते 35% एजंट कमिशनऐवजी केवळ 20% एजंट कमिशन द्यायला लागणार आहे. यामुळे तुमचा प्रीमियम कमी होणार आहे. तसेच तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडर किमतीचा आढावा घेऊन यामध्ये आवश्यक बदल करतात.1 सप्टेंबररोजी गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर केले जातील. यामध्ये वाढ किंवा दरकपात पाहायला मिळू शकते.

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी विशेष अपडेट. पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांनो 31 ऑगस्टपर्यंत KYC अपडेट करायला विसरू नका. तुमी KYC अपडेट केली नाही तर सणासुदीत तुमचं अकाऊंट ब्लॉक होऊ शकतं. अशात तुम्हाला आर्थिक व्यवहार जगताना त्रासाचा सामना करावा लागू शकतो.

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल

वंचितची विधानसभेची पहिली यादी जाहीर; पहिल्या यादीत 11 उमेदवारांचा समावेश