Admin
ताज्या बातम्या

...तर मी माघार घेणार; मुरजी पटेल यांचं अतिशय महत्वाचे वक्तव्य

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरुन राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपाचे नेते मुरजी पटेल आज गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरुन राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपाचे नेते मुरजी पटेल उद्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आज सकाळी 9 वाजता शेरे-पंजाब ग्राउंडमधून आपल्या पंधरा ते वीस हजार समर्थकांच्या सोबत ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 2019 मध्ये विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यावर मुरजी पटेल यांनी अपक्ष ही निवडणूक लढवली. मुंबई भाजपची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी पोटनिवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला मुरजी पटेलही हजर होते. या बैठकीनंतरच मुरजी पटेलांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

१५ ते २० हजार समर्थकांच्या साक्षीने मुरजी पटेल आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. निवडणूक लढवण्याची सूचना आली तर लढणार, नाहीतर पक्षादेश असेल तर माघार घेणार. शेवटी मी पक्षादेश पाळणारा कार्यकर्ता आहे. देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यावर पक्षाची अधिकृत भूमिका मांडतील" असे मुरजी पटेल यांनी सांगितेल. ऐनवेळी भाजप उमेदवार माघार घेऊन शिंदे गटाचा उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघ भाजप लढवणार की शिंदे गट याचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. मुरजी पटेल यांनी या मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. ही जागा जर भाजपकडे गेली तर तेच उमेदवार असतील यात शंका नाही. पण ही जागा शिंदे गट लढवणार असेल तर ते शिंदे गटाचे उमेदवार होणार का हे पाहावं लागेल. 

2019 मध्ये विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यावर मुरजी पटेल यांनी अपक्ष ही निवडणूक लढवली. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व मतदारसंघात जवळपास 1 लाख 47 हजार 117 मतदान झाले होते. त्यापैकी रमेश लटके यांना 62 हजार 773 मतं मिळाली. तर मुरजी पटेल यांना 45 हजार 808 मतं होती. 2020 मध्ये मुरजी पटेल यांची भाजपच्या मुंबई उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. 

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी