शिंदे गट ठाकरे गटाला नेहमीच धक्क्यांवर धक्के देत असते. तसेच शिंदे गटातील मंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या गटातील नेते एकमेकांवर नेहमीच प्रतिक्रिया देत असतात. सध्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका केली जात आहे. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी होताना पाहायला मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलतांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अब्दुल सत्तार म्हणाले की, मुख्यमंत्री यांनी परवानगी दिली तर बुधवारपर्यंत मी राजीनामा देऊ शकतो. मात्र त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील राजीनामा देऊन सिल्लोडमधून निवडणूक लढवून दाखवण्याची हिम्मत करावी असे ते म्हणाले.
यासोबतच ते म्हणाले की, जेव्हा मी उद्धव ठाकरेंच्या पक्षात होतो तेव्हा त्यांना मी हिंदुत्ववादी वाटत होतो. आता पक्ष सोडला म्हणून लगेच त्यांच्या दृष्टीने वाईट झालो का? तसेच गेल्या लोकसभा निवडणुकीत खैरे यांची जीलील यांच्यामार्फत मीच विकेट घेतली होती. आता खैरे चांदीचा गदा घेऊन फिरत आहे. मात्र त्यांच्या गेदेचा सामना करण्यासाठी आमची ढाल तयार आहे. असे म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.