ताज्या बातम्या

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू; विविध विधेयकांवर होणार निर्णय

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरु होत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू

  • अदानीसंदर्भातील मुद्दा सभागृहात मांडला जाण्याची शक्यता

  • रविवारी सर्वपक्षीय बैठकीत विरोधक आक्रमक

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात 16 विधेयके मांडली जाणार आहेत. हे अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. हे अधिवेशन अनेक मुद्यांवर गाजण्याची शक्यता आहे.

यातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून महाराष्‍ट्र विधानसभा निवडणुकीचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय बैठक घेण्यात आली. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, मंत्री अनुप्रिया पटेल, काँग्रेस नेते जयराम रमेश, गौरव गोगोई, खा. हरसिमरत कौर बादल हे उपस्थित होते.

या अधिवेशनामध्ये अदानी प्रकरण गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून विरोधी पक्षाने याच मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चेची मागणी केली असल्याची माहिती मिळत आहे.

अजित पवार यांच्या पाया पडल्यानंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Latest Marathi News Updates live: नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

मुंबईत 36 पैकी 16 जागा जिंकत भाजपची जोरदार मुसंडी

मध्य रेल्वे मार्गावर तीन दिवस विशेष वाहतूक ब्लॉक