सिंधुदुर्ग : मालवणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मालवणमधील तारकर्ली (Tarkarli) येथे पर्यटकांची (Tourist) बोट बुडाली आहे. या बोटील एकूण 20 पर्यटक आहे. यातील 2 पर्यटकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.
तारकर्ली येथे पर्यटकांची बोट 20 जणांची बोट बुडाली. स्कुबा ड्रायव्हिंग करुन परतताना ही घटना घडली आहे. बोट बुडताना दिसताच स्थानिकांनी मदतकार्य करत 16 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. तर 2 पर्यटकांचा मृत्यू झाला तर दोन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये मुंबई, पुण्यातील पर्यटकांचा समावेश आहे. दरम्यान, बोट नेमक्या कोणत्या कारणामुळे बुडाली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तरी पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून तपास सुरु आहे.
तारकर्ली हे पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. दरवर्षी याठिकाणी मे महिन्यात पर्यटकांची मांदियाळी असते. परंतु, याच ठिकाणी बोट बुडाल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.