ताज्या बातम्या

राज्य सरकारने सप्तशृंगी मंदिरात पशुबळीसाठी दिली परवानगी

Published by : Siddhi Naringrekar

नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध सप्तशृंगी मंदिरात पशुबळी देण्यावर राज्य सरकारने 2017मध्ये बंदी घातली होती. ही बंदी आता उठवण्यात आली आहे. न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला आणि आरएन लड्ढा यांच्या खंडपीठाने ही याचिका निकाली काढली. प्राण्यांच्या बळी देण्यास परवानगी देऊ अशी माहिती महाराष्ट्र सरकारने नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाला दिली.

आदिवासी आणि इतर समाज बकऱ्यांचा बळी देत ​​आले आहेत आणि हा विधी त्यांच्या धर्माचा अविभाज्य भाग आहे. जर हा पशुबळी दिला नाही तर अशुभ मानले जाते. पशुबळीवरील बंदी उठवण्यासाठी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. दरम्यान राज्य सरकारने पशुबळीला परवानगी देऊ मात्र इतर कोणत्याही विधींना परवानगी नाही देणार असल्याचे स्पष्ट केले.

2016 मध्ये झालेल्या गोळीबारात 12 जण जखमी झाल्यानंतर 2017 मध्ये पशुबळीवर बंदी घालण्याचा आदेश देण्यात आला. 2016 मध्ये झालेल्या गोळीबारात 12 जण जखमी झाल्यानंतर या अपघाती गोळीबाराच्या घटनेमुळे लोकांना दुखापत झाली आणि त्यामुळे बंदी घालण्यात आली अशी याचिका 2017 मध्ये करण्यात आली होती.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...

Metro 3: मेट्रो-3 च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण ऑक्टोबरमध्ये

I phone Launch: बहुप्रतीक्षित आयफोन-16ची विक्री सुरु; आयफोन-16 सिरीजच्या खरेदीदारांमध्ये क्रेझ