ताज्या बातम्या

गोंदियात दमदार पावसाची हजेरी सूर्याटोला भागातील अनेक घरात शिरले पाणी

Published by : Dhanshree Shintre

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार गोंदियात मध्यरात्री पासून दमदार हजेरी लावली आहे. तर गोंदियाच्या सूर्याटोला भागात असलेला बांध तलाव ओव्हर फ्लो झाल्याने अनेक घरात पाऊसाचे पाणी शिरले आहे. तर रात्रीपासून दमदार पाऊस सुरु असल्याने ग्रामीण भागात देखील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत, तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशीच परिस्थिती सर्वच जिल्यात पाहायला मिळाली आहे.

विशेष बाब म्हणजे मागच्या पंधरा दिवसापासून पावसाने पाठ फिरविली होती, मात्र रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सलग दुसऱ्या दिवशीही भामरागड मधील पूरस्थिती कायम असून येथील जवळपास 50 हून अधिक कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. येथील बाजारपेठ पूर्णतः पाण्याखाली असून अनेक घरांमध्येही पाणी शिरले आहे.

जिल्ह्याच्या दक्षिण भागातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, अहेरी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिणामी साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मोठी नासधूस झाली आहे. तर दुसरीकडे सिरोंचा तालुक्यातही पूरस्थिती उद्भवली असून करजेली गावातील 28 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

shirdi saibabatemple | शिर्डीत साईबाबांच्या चरणी हिरेजडीत सुवर्णमुकुट अर्पण | Marathi News

Solapur | भर पावसात मराठा आंदोलकांनी अडवला अजित पवारांचा ताफा, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी

Big Boss Marathi 5: यावेळी एलिमिनेशनच्या जाळ्यात अडकले निक्की आणि अरबाज कोण होणार घरातून बेघर ?

Shraddha Arya: लोकप्रिय सिरियल "कुंडली भाग्य"मधील अभिनेत्रीच्या घरात नव्या पाहुण्याची चाहूल

Navratri 2024: नवरात्रीचे नऊ दिवस अखंड ज्योति पेटती राहण्यासाठी घ्या "ही" काळजी