अमेरिकेत एक मोठी दुर्घटना टळली आहे. अमेरिकेतील अलास्का एअरलाइन्सच्या बोइंग विमानाचा अचानक दरवाजा तुटला आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. टेक ऑफ केल्यानंतर आकाशात सुमारे 16 हजार फूट उंचीवरुन ही घटना घडली. त्यामुळे विमानातील सर्व 177 जणांचा जीव धोक्यात आला होता. यामध्ये सहा क्रू मेंबर्स होते. आपत्कालीन परिस्थिती पाहता विमानाचे पोर्टलँड येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
मेरिकेतील अलास्का एअरलाइन्सच्या बोइंग विमानाचा दरवाजा अचानक तुटला. टेक ऑफ केल्यानंतर आकाशात सुमारे 16000 फूट उंच विमान गेल्यावर हा दरवाजा उडून गेला. अचानक झालेल्या या घटनेमुळे विमानात गोंधळ उडाला. विमान क्रॅश होईल या भीतीने नागरीक जिवाच्या आकांताने ओरडू लागले. विमानातील सर्व 177 जणांचा जीव धोक्यात आला होता. आपत्कालीन परिस्थिती पाहता विमानाचे पोर्टलँड येथे एमर्जन्सी लँडिंग करावे लागले. अलास्का एअरलाइन्सचे फ्लाइट 1282 पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4.52 वाजता निघाले होते, परंतु उड्डाणा नंतर काही क्षणात हा अपघात झाल्याने विमानाचे 5.30 वाजता पोर्टलँड विमानतळावर पुन्हा लँडिंग करण्यात आले. थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
बोईंग 737 मॅक्स १ ऑक्टोबर 2023 रोजी अलास्का एअरलाइन्सकडे हस्तांतरित करण्यात आले. 11 नोव्हेंबर 2023 रोजी ते व्यावसायिक सेवेत दाखल झाले. Flightradar24 ने सांगितले की त्यांनी आतापर्यंत फक्त 145 उड्डाणे पूर्ण केली आहेत. विमान हवेत गेल्यावर अचानक विमानाचा दरवाजा तुटल्याने प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला होता. भीतीने प्रवासी ओरडू लागले होते. मात्र, वैमानिकाने विमान सुरक्षित उतरवल्यावर प्रवाशांनी सुटकेचा निश्वा:स टाकला.