राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यामध्ये मंगळवारी ७११ नवे रुग्ण सापडले. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ७९२ इतकी झाली आहे. राज्यात चार करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली.
कोरोना प्रादुर्भावात होणारी वाढ पाहता आरोग्य मंत्रालयानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, आरोग्य मंत्रालयाने लोकांना सोशल डिस्टेंसिंग पाळण्याचं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं त्याचप्रमाणे, मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.
मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांपैकी २ टक्के प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येते. यापैकी कोरोनाबाधित झालेल्या प्रवाशांचे नमूने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येतात विमानतळावर मंगळवारी आणखी तीन कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या ५५ वर पोहोचली आहे.