ताज्या बातम्या

संसदेचे पावसाळी अधिवेशन 'या' तारखेपासून होणार सुरु

Parliment Monsoon Session यंदाही गाजणार; विविध मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : संसदेचे (Parliment) यंदाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) 18 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधी दरम्यान होण्याची शक्यता आहे. संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत या तारखांची शिफारस केली गेली आहे. दरम्यान, 18 जुलै रोजी राष्ट्रपती निवडणूक (Presidential Election) होणार असल्याने विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

आगामी पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत होणार असून 17 दिवस होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनादरम्यान राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपती पदासाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र, उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीची अद्याप घोषणा झालेली नाही. राष्ट्रपती निवडणुकीनेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

यंदाचे पावसाळी अधिवेशनही वादळी ठरण्याची शक्यता आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी एकजुटीने सरकारला घेरण्याच्या तयारीत असणार आहेत. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती, वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलसह इंधनाच्या वाढत्या किमतींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती निवडणुकीस विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. निवडणूक बिनविरोध करण्याच्या मनस्थितीत विरोधक नाहीत. विरोधकांकडून संयुक्त उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहेत. परंतु, निवडणूक लढविण्यास शरद पवारांनी नकार दिला असला तरीही विरोधकांकडून मनधरणीचा प्रसत्न सुरु आहे. यासाठी आज दिल्लीत विरोधकांची बैठक होणार आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी