ताज्या बातम्या

Neet Exam : नीट परीक्षेतील घोळ संपता संपेना; एनटीएच्या प्रतापामुळे विद्यार्थिनीला नाहक मनस्ताप

Published by : Dhanshree Shintre

नीट परीक्षेतील घोळ संपता संपेना अशीच परिस्थिती आहे. फेरपरीक्षा दिली नसताना विद्यार्थिनीला नव्या गुणपत्रिकेत कमी गुण मिळालेले आहेत. 640 गुण मिळाले असताना नव्या गुणपत्रिकेत 172 गुण मिळालेले आहेत. एनटीएच्या प्रतापामुळे विद्यार्थिनीला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. परीक्षेतील घोळाचा यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील देऊरवाडीतील एका विद्यार्थिनीला हा फटका बसला आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) राबविलेल्या वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षेचा सावळागोंधळ संपण्याची चिन्हे नाहीत. या महाघोटाळ्याचा मोठा फटका यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील देऊरवाडी येथील एका विद्यार्थिनीला बसला आहे. या मुलीला पहिल्या परीक्षेत 640 गुण मिळाले होते व ऑल इंडिया रँक 11 हजार 769 होती.

मात्र, दुसऱ्यांदा झालेली परीक्षा दिली नसताना नव्याने आलेल्या गुणपत्रिकेत तिचे गुण 640 वरून थेट 172 वर खाली आले आणि 11 हजाराच्या रँकवरून ती थेट 11 लाख 15 हजार 845 व्या रँकवर फेकली गेली. भूमिका राजेंद्र डांगे असे अन्याय ग्रस्त विद्यार्थीनीचे नाव आहे. एनटीएने ग्रेस गुण मिळालेल्या 1500 विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली. या परीक्षेशी भूमिकाचा काहीही संबंध नाही. तरी गुणपत्रिका बदलून मिळाली. यामुळे डांगे कुटूंबाला धक्का बसला असून, भूमिकाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले.

अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पोलिसांकडून बंद; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...