मागील काही वर्षांपासून चित्रपटांवरून प्रचंड गोंधळ सुरू आहे. त्यातच एकापाठोपाठ एक चित्रपटावरून वादंग सुरू असताना त्यातच 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. या चित्रपटावरून वातावरण चांगलेच तापले आहे. वादात सापडलेला ह्या चित्रपटावर काही लोकांकडुन बंदी घालण्याची मागणी ही केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सुदीप्तो सेन यांच्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर बंदी घालण्याची घोषणा केली. त्यामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बंदीवर तात्काळ चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. केरळमधील 32,000 मुली बेपत्ता झाल्या आणि नंतर दहशतवादी गट, ISIS मध्ये सामील झाल्याचा दावा केल्याबद्दल ट्रेलरवर टीका करण्यात आली होती. परंतु चित्रपट रिलीज झाल्यापासून एकच गदारोळ सुरू आहे. त्यातच पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर आता बंदी घालण्यात आली आहे. पश्चिम बंगाल सरकारने 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर बंदी घातल्यानंतर या चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान विपुलने म्हटले आहे की,'बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घातल्यास आम्ही कायदेशीर मार्ग स्वीकारू' असे ते म्हणाले.