कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मोठ मोठ्या गणपतींचे आगमन अगदी थाटामाटात झाले. १० दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते. मुंबईच्या राजाचे विसर्जन मिरवणूक सोहळ्याला सुरुवात झाली आहे. गुलालाची उधळण करुन बाप्पाची मिरवणूक निघाली आहे. जल्लोषाचे वातावरण, फटाक्यांती आतषबाजी होत आहे.
मुंबईत गिरगाव, जुहू चौपाटी या प्रमुख विसर्जन स्थळांसह कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेत. तिकडे पुण्यातल्या मानाच्या गणपतींचं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन करण्यात येणार आहे... तसंच नाशिक, नागपूर, कोल्हापूर यासह राज्यभर स्थानिक प्रशासनानं गणपती विसर्जनासाठी मोठी तयारी केली. बाप्पाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर २० हजार पोलिसांना विसर्जन स्थळ व मार्गिकांवर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे.