भूपेश बारंगे, वर्धा : जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील बांगडापूर परिसरात वाघाने दहशत माजवली आहे. नुकताच दोन दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात शेतकरी व बैलाचा मृत्यू झाला. सततच्या हल्ल्याने गेल्या काही वर्षांत आर्वी विधानसभा क्षेत्रात मृत्यू होणाऱ्या नागरीकांची संख्या 13 वर पोहचली आहे. यात कारंजा 7,आष्टी 5 ,आर्वी येथे अस्वलाच्या हल्ल्यात 1 मृत्युमुखी झाला आहे. यातच पशुधनाची संख्या शेकडोच्या घरात आहे. यात शेतकऱ्यांवर होणाऱ्या वाघाच्या हल्ल्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी लावून धरली आहे. त्यासाठी आता आर्वी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीला 2 ऑक्टोबर रोजी नागपूर राष्ट्रीय - अमरावती महामार्ग सहावरील हेटीकुंडी फाट्यावर चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. अशी माहिती माजी आमदार अमर काळे यांनी शासकीय विश्रामगृह कारंजा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली देत हे आंदोलन सुरू केले जाईल. याच वेळेस वाघाच्या हल्ल्यात ठार झालेंल्या व अस्वलीसह हिंसक प्राणाच्या हल्ल्यात ठार झालेल्या 13 नागरिकांना श्रद्धांजली दिली जाणार आहे. या परिसरात पडीक जमिनीमुळे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे. हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेल्या कुटुंबाला सध्याचे शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून 20 लाखाचा निधी दिला जातो, हा निधी तुटपुंज्या असून तो वाढवून 50 लाखाचा निधी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. परिसरातील येनी दोडका, मेठहीरजी, मरकसुर,उमरविहिरी, गरमसुर या पाच गावाचा पुनर्वसन प्रश्न अद्यापही धूळखात असून त्याला मार्गी लावण्यात यावा. तसेच मृत्यूकाच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नौकरी मध्ये सामावून घ्यावे. तसेच अश्या घटना घडणार नाही याकडे वनविभागाला लक्ष द्यावे अश्या मागण्या माजी आमदार अमर काळे यांनी केले आहे.
परीसरातील बांगडापूर,नागझरी, धानोली, आजनडोह, ढगा, हेटीकुंडी, सावळी, आगरगाव, कन्नमवार ग्राम, अंभोरा मेठहिराजी ,सिंदीविहिरी ,मरकसुर, ब्राम्हणवाडा, उमरी, राहटी,धानोली, मेठहीरजी, नांदोरा,सावल, लिंगामांडवी, उमरविहिरी, बांगडापूर या गावातील नागरिक या आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान केले आहे. पत्रकार परिषदेला माजी आमदार अमर काळे, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष टिकाराम चौधरी, नगर पंचायत उपाध्यक्ष भगवान बोवाडे, माजी उपाध्यक्ष नितीन दर्यापूरकर,विशाल इंगळे, राजेश लाडके,कमलेश कठाने, जया देऊरकर यांची उपस्थिती होती.
वाघिणीला आवरा ; आजी - माजी आमदारांचा वनविभागाला दम
तालुक्यात वाढत्या वाघाच्या हल्ल्यात बळीराज्यात दहशत पसरत आहे यातच अनेकांना जीवाशी ठार झाले आहे. वाघिणीला आवरा शेतकऱ्याला सावरा अस दम आजी माजी आमदाराने वनविभागाला दिले आहे. कुटुंबातील सदस्याला शासकीय नौकरित सामावून घ्यावे अशी मागणी पुढे येत आहे.
वाघिणीसाठी जंगलात 50 ट्रॅप कॅमेरे
वाघिणीच्या हल्ल्याने वनविभागाची डोकेदुखी वाढवली आहे. यात या वाघिणीच्या शोधात तीन पथक तैण्यात लावले असून जंगल परीसरात रात्रंदिवस पुंजून काढत आहे. यात जंगल परिसरात आतापर्यंत 50 ट्रॅप कॅमेरे लावले असून वाघिणीचा शोध सुरू केला आहे. या कॅमेऱ्यात कुठे कैद होते त्याकडे वनविभागांचे लक्ष लागले आहे.