जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड उड्डाणपूल (Jogeshwari Vikhroli Link Road ) 12 दिवस बंद राहणार आहे.
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड उड्डाण पुलाच्या विभिन्न भागांतील सांधे भरण्याचे काम 13 ते 24 मे दरम्यान केले जाणार आहे. त्यामुळे या काळात हा पूल वाहतुकीसाठी पूर्णत: बंद राहणार आहे.
जोगेश्वरी (पश्चिम) मधील लिंक रोडला पूर्वेकडील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) ला पश्चिम द्रुतगती महामार्ग (WEH) वर जोडणारा हा उड्डाणपूल आहे.
वाहतुकीसाठी चांगला पर्याय असलेल्या या उड्डान पुलाची डागडुगी करण्यात येणार आहे.