आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होते. आमदार प्रणिती शिंदे यांनी टंचाईग्रस्त भागात सामाजिक संघटनांकडून पाणी वाटप करण्यासाठी आचारसंहितेमधून मुभा द्यावी अशी विनंती या पत्रातून निवडणूक आयोगाला केली होती.
याच पत्राची आता निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. निवडणूक आयोगाने त्या पत्राची दखल घेत ग्रामीण भागात टँकरच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांना आचारसंहितेच्या नियमांतर्गत पाणी वाटपासाठी मुभा देण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.