पुणे महापालिकेच्या उपायुक्तांना आता नाईट ड्युटी असण्याची माहिती मिळत आहे. पुणे शहरातील पाणी तुंबण्याच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. रोज रात्री एका उपायुक्त स्तरावरचा अधिकारी या ठिकाणी नियुक्त असणार आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. पाऊस पडत असताना संपूर्ण शहरावर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून नजर ठेवली जाणार आहे.
या उपायुक्तांना ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला असेल त्या ठिकाणी लगेच मदत पोचविणे आणि आदेश देणे अशी कामे करावी लागणार आहेत. उपायुक्त दर्जाचा अधिकारी रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत उपस्थित असणार आहे.