बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या तसेच सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. बदलापूरमधील एका शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने हे दृष्कृत्य केलं आहे. ही घटना उजेडात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. बदलापूरमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेला आदोलकांनी घेराव घातला आहे. तर बदलापूर रेल्वे स्थानकावरही शेकडो आंदोलक जमा झाले असून त्यांनी सर्व रेल्वे रोखून धरल्या आहेत. याच घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाश शिंदे म्हणाले, झालेली घटना खूप दुर्देवी आहे. मी पोलीस आयुक्तांशी बोललो आहे की, समंजस गुन्हेगाराला अटक झालेली आहे. पण त्याच्यावर जे काही गुन्हे दाखल करायचे आहेत, कलमं लावायचे आहेत, त्याच्यावर कडक कलमं लावाण्याचे सूचना मी दिलेल्या आहेत. फास्ट्रेकवर केस घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष वकिल सरकारी वकिल देण्याच्या मी सूचना दिल्या आहेत. जेणेकरुन या केसचा निपटारा तात्काळ लागेल. एक समाजमध्ये जाईल की अशा प्रकारचे कृत्य केल्यावर कडक, कठोर शिक्षा होते आणि त्याचबरोबर ज्या संस्थाचालक आहेत, संस्थाचालकांची जबाबदारी देखील आहेत की या मुलींना हँडल करण्यासाठी जे कर्मचारी आहेत त्यांची पूर्ण बॅकग्राऊंड, त्यांचा ट्रेक रेकॉर्ड सगळं तपासून त्यांना कामावर ठेवावं आणि अशा प्रकारच्या संस्थाचालकांच्या देखील चौकशी करण्याची मी सूचना दिल्या आहेत आणि जे दोषी संस्थाचालक असतील त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे सूचना दिल्या आहेत. यासंबंधित शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशीही मी बोललो. त्यांनाही मी सांगितलं की अशा प्रकारची नियमावली झाली पाहिजे की पुन्हा दुसऱ्या संस्थेमध्ये अशा प्रकारचे विनयभंग होता कामा नये. गुन्हेगारावर कठोर कारवाई झाली पाहिजे असे एकनाथ शिंदे म्हणाले.
याच प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियवर पोस्ट शेअर केली आहे. ते ट्विट करत म्हणाले की, बदलापूरमध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली. सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाय योजण्यास सांगितले.