Murder  Team Lokshahi
ताज्या बातम्या

Crime | नपुंसक म्हटले म्हणून प्रियकरानेच प्रेयसीचा केला खून

मृतदेह गोणीत भरून रेल्वे रुळाच्या बाजूला फेकला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : नपुंसक म्हटले म्हणून प्रियकरानेच प्रेयसीला चाकूने वार करुन जीवानिशी मारले असल्याची घटना मुंबई उपनगरात घडली आहे. तर, पोलिसांना (Police) चकमा देण्यासाठी आरोपींनी मृतदेह गोणीत भरून रेल्वे रुळाच्या बाजूला फेकून दिला होता. परंतु, रेल्वे जीआरपीने (Railway GRP) अवघ्या आठ तासात या खुनाचा छडा लावत आरोपीला ताब्यात घेतले आहे. विकास खैरनार असे आरोपीचे नाव आहे.

प्रेयसीने गंमतीने आरोपीला नल्ला म्हणजेच नपुंसक म्हटले होते. त्यामुळे त्याचा स्वाभिमान दुखावला गेला आणि विकास खैरनारने प्रेयसीवर चाकूने वार करून तिचा खून केला. पोलिसांना चकमा देण्यासाठी आरोपींनी मृतदेह गोणीत भरुन माहीम येथील रेल्वे रुळाच्या बाजूला फेकून दिला होता. पण, याच मृतदेहाच्या गोणीमुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यात मदत झाली.

प्रेयसीने का गमावले प्राण?

तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, मयत 30 वर्षीय महिला ही गोरेगाव दिंडोशी परिसरातील रहिवासी होती. महिला विवाहित असून ती एका खाजगी कंपनीत घरकाम करत होती. त्याच कंपनीत काम करणाऱ्या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. घटनेच्या काही दिवस आधी महिलेने गंमतीत आरोपीला 'तुझमें दम नहीं है' असे म्हणून इतर मुलांशी बोलू लागली. याचा राग मनात ठेऊन आरोपीने महिलेला जीवनिशी मारले.

पोत्यामुळे सापडला आरोपी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पोत्याने या हत्येचे रहस्य उलगडले आहे. ज्या गोणीत महिलेचा मृतदेह सापडला होता. त्यावर गोरेगावचा पत्ता लिहिला होता. पोलीस पथकाने त्या पत्त्यावर तपास सुरू करून गोपनीय सुत्रधारांना सक्रिय केले होते. तपासासंदर्भात पोलिसांचे एक पथक दिंडोशी पोलीस ठाण्यात गेले. तिथे महिलेच्या कुटुंबियांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. घरच्या सदस्यांनी सांगितले की, महिला एका कंपनीत घरकाम करते. त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी गेले असता कंपनी कर्मचाऱ्यांच्या चौकशीत आरोपीचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपीची अधिक चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबुल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती